Pune News l विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आता आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यतील कोथरुडमध्ये भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या अमोल बालवडकरांच्या सासरी ईडीने धाड टाकली आहे. अमोल बालवडकर यांचे मेहुणे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुण्यात ईडीने केली कारवाई :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांच्या घरावर ईडीने कारवाई केली आहे. याशिवाय अभिजीत कटेक हे ज्या तालमीमध्ये सराव करतात तिथे देखील आयकर अधिकारी पोहचले आहेत.
कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरीत असलेल्या अमोल बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट देखील दिली होती . मात्र तरी देखील अमोल बालवडकर ऐकत नसल्याने ही ईडीने ही कारवाई केली असल्याच्या चर्चा आता राज्यात रंगू लागल्या आहेत.
Pune News l तालीमीत काय मिळणार तर मातीच मिळणार :
पैलवान अभिजीत कटके हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा आहे. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर अमोल बालवडकर यांनी बंडखोरीचा त्यांचा पवित्रा कायम ठेवला आणि त्यानंतर आज त्यांच्या मेहुण्याच्या घरावर ईडीने थेट कारवाई केली आहे.
यावर अमोल बालवडकर यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना आता विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिला आहे. तसेच आज सकाळी महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला असून अभिजीत कटके ज्या तालमीत सराव करतो अगदी त्या तालमीत देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी थेट पोहचले आहेत. परंतु ईडी अधिकाऱ्यांना तालीमीत काय मिळणार तर मातीच मिळणार आहे असे अमोल बालवडकर म्हणाले आहेत.
News Title : ED raid on abhijeet katke home
महत्वाच्या बातम्या –
भाजपच्या कट्टर नेत्यानी साथ सोडली! शिवसेनेत प्रवेश करणार
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात खेचणार असल्याचा इशारा!
फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी जबरदस्त SUV लाँच; जाणून घ्या फीचर्स व किंमत
महाराष्ट्रातील ‘या’ जागांवर होणार कांटे की टक्कर, पाहा कुणाचं पारडं भारी?
कट्टर समर्थकाचा अजित पवारांना मोक्याच्या वेळी धक्का, पुण्यात मोठी उलथापालथ?






