घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!

On: October 12, 2024 1:45 PM
Dussehra 2024
---Advertisement---

Dussehra 2024 | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसऱ्याचा (Dussehra 2024) सण हा अत्यंत शुभ मानला जातो. वाईटावर सत्याचा विजय म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. याचबरोबर दसऱ्याचा दिवस हा खरेदीसाठी शुभ मानला जातो. तुम्ही आजच्या या शुभ दिनी तुमच्या राशीनुसार काही वस्तूंची खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी चालून येईल.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ वस्तु खरेदी करा

मेष रास – या राशीच्या व्यक्तींनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादं रोप खरेदी करावं. यामुळे तुमच्या जीवनात सुख येईल. गरीबी दूर होईल.

वृषभ रास – या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी वाहन खरेदी करणं शुभ ठरु शकतं. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल.

मिथुन रास – या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी एखादे मातीचे भांडे खरेदी करणं शुभ ठरेल.

कर्क रास – या राशीच्या लोकांनी आजच्या शुभ मुहूर्तावर पितळ्याचा कलश खरेदी करणं शुभ ठरेल. पितळ्याच्या कलशावर कुबेर वास करतो अशी पौराणिक मान्यता आहे. (Dussehra 2024)

सिंह रास – या राशीचे व्यक्ती दसऱ्याच्या दिवशी चांदीची नाणी खरेदी करु शकतात.

कन्या रास – कन्या राशीच्या लोकांनी कामधेनु मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जाईल. कामधेनु ही इच्छा पूर्ण करणारी गाय म्हटलं जातं.

तूळ रास – या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी तुळशीचं रोप लावावं. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येईल.

वृश्चिक रास – या राशीच्या लोकांना चांदीच्या वस्तू फार लाभदायक ठरतात. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही चांदीची भांडी, चांदीची नाणी यांसारख्या वस्तू खरेदी करु शकता. (Dussehra 2024)

धनु रास – या राशीच्या लोकांनी सोन्याची कोणतीही वस्तु खरेदी करावी. तुमच्या जीवनात धनाची कधीच कमी भासणार नाही.

मकर रास – या राशीच्या लोकांवर देवी सरस्वतीची कृपा असल्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेत भर पडणाऱ्या गोष्टी खरेदी करु शकता.

कुंभ रास – या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी रुमाल किंवा एखादं कापड खरेदी करणं शुभ राहील.

मीन रास – आज तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. तुम्हाला त्यातून आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. (Dussehra 2024)

News Title –  Dussehra 2024

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा अडचणींमध्ये होईल वाढ

“..हीच वचपा काढण्याची, क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन

कोकण हार्टेड गर्लचे सूर जुळले; सांगितलं बॉयफ्रेंडच नाव

विखे पाटलांच्या आशीर्वादाने पुण्यातील ‘या’ भागातील दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न!

सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना मोठं आवाहन; थेट म्हणाले..

Join WhatsApp Group

Join Now