तुमचीही त्वचा काळी पडतेय? फॉलो करा ‘या’ ५ घरगुती टिप्स

On: January 21, 2026 5:46 PM
Healthy Skin
---Advertisement---

Dry Skin Care | कोरडी त्वचा ही फक्त सौंदर्याची नाही तर आरोग्याचीही समस्या ठरू शकते. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यावर ती रुक्ष, खरबरीत आणि ताणलेली वाटू लागते. सुरुवातीला खाज, लालसरपणा आणि पांढरट रेषा दिसतात, तर दुर्लक्ष केल्यास भेगा पडणे, जळजळ होणे आणि कधी कधी रक्तस्रावही होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

हिवाळ्यात हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे त्वचेतील ओलावा झपाट्याने निघून जातो. गरम पाण्याने अंघोळ, हीटरचा वापर, अपुरी पाण्याची मात्रा, संतुलित आहाराचा अभाव आणि कडक केमिकलयुक्त साबण यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक तेज कमी होतो आणि ती लवकर वृद्ध दिसू लागते. (dry skin care)

कोरड्या त्वचेसाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स :

अंघोळीसाठी फार गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरणे फायदेशीर ठरते. सौम्य आणि मॉइश्चरायझिंग साबणाचा वापर करून अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे, जेणेकरून त्वचेतील ओलावा टिकून राहील. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, आहारात फळे, हिरव्या भाज्या, सुकामेवा आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करणेही आवश्यक आहे. (Dry Skin Care)

थंड वाऱ्यापासून त्वचा वाचवण्यासाठी हातमोजे, गरम कपडे वापरणे उपयुक्त ठरते. ओठांसाठी लिप बाम आणि हातांसाठी हँड क्रीमचा नियमित वापर केल्यास त्वचा मऊ आणि निरोगी राहते. नियमित आणि योग्य काळजी घेतल्यास हिवाळ्यातही त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसू शकते.

Dry Skin Care | कोणते तेल कोणत्या त्वचेसाठी उपयुक्त? :

बदाम तेल: कोरड्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर. यात व्हिटॅमिन A, E आणि झिंक असल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि डोळ्यांखालील काळेपणा कमी होण्यास मदत होते. (glowing skin tips)

नारळ तेल: कोरड्या त्वचेसाठी योग्य असले तरी तेलकट त्वचेसाठी छिद्र बंद होण्याचा धोका असतो.

केशर तेल: त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी उत्कृष्ट. पिगमेंटेशन, मुरुमांच्या समस्या कमी करण्यास मदत होते आणि त्वचेची लवचिकता वाढवते.

एरंडेल तेल: संपूर्ण चेहऱ्यावर वापरण्याऐवजी भुवया आणि पापण्यांसाठी उपयुक्त मानले जाते.

गुलाबाचे तेल: अँटी-एजिंग गुणधर्मांनी भरपूर असून त्वचा घट्ट ठेवते आणि कोलेजन वाढवण्यास मदत करते.

News Title: Dry Skin Will Glow Naturally! Follow These Easy Skincare Tips

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now