Pune Crime l पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपी व्यक्तीने पोलिसांना अरेरावी करत त्यांची गचांडी पकडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील वडगाव शेरी येथील सोपाननगर येथे घडली आहे. 10 फेब्रुवारीच्या रात्री सव्वानऊ वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी चार जणांना अटक :
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. स्वप्निल संजय काळदाते (वय 25), अक्षय अशोकराव इंगोले (वय 29), समीर गौतम डंबाळे (वय 22) आणि अभिजित राजेंद्र निकम (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pune Crime l संपूर्ण प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे आरोपी मद्यपान करून गाडीमध्ये गाणी लावून मोठ्या आवाजात धिंगाणा घालत होते. या संदर्भात पोलिसांना नियंत्रण कक्षातून फोन आल्यावर पोलीस अंमलदार अजित कोकाटे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौघांनाही धिंगाणा घालण्यास मनाई केली.
त्यामुळे चौघांनी पोलिसांना अरेरावी करण्यास सुरुवात केली आणि थेट त्यांची गचांडी पकडली. यानंतर पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे.





