Actress Tabu | बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तब्बू (Actress Tabu) ही इंडस्ट्रीतील (Industry) अत्यंत प्रतिभावान (Talented) अभिनेत्रींपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात (90s) आपल्या फिल्मी करिअरची (Film Career) सुरुवात करणारी तब्बू आजही अनेक दमदार भूमिका साकारताना दिसते. तब्बू तिच्या चित्रपटांसोबतच (Movies) खासगी आयुष्यामुळेही (Personal Life) अनेकदा चर्चेत असते. 53 वर्षीय तब्बू आजही अविवाहित (Unmarried) आहे.
अशात अभिनेत्रीसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. अभिनेत्री तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांचा एक किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. तब्बूने आजपर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. मात्र, तिने जॅकी श्रॉफसोबत कधीच काम न करण्याचं ठरवलं. यामागचं कारणही तसंच आहे.
नेमकं काय घडलं होतं?
जॅकी श्रॉफने एका पार्टीत तब्बूला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अभिनेत्रीने या कलाकारासोबत कधीच काम केलं नाही. हा प्रसंग होता 1986 मधला. जॅकी श्रॉफ हे तब्बूची मोठी बहीण फराह नाझसोबत ‘दिलजला’ या चित्रपटात काम करत होते.यामध्ये तनुजा आणि डॅनी डेंझोपा यांच्याही भूमिका होत्या.
या चित्रपटाची शूटिंग ही मॉरिशसला होणार होती. शूटिंगसाठी फराहने तिच्या किशोरवयीन बहीण तब्बूलाही (Actress Tabu) सोबत आणलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगनंतर डॅनी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना बोलावलं होतं. याच पार्टीत दारूच्या नशेत असलेल्या जॅकी श्रॉफ यांनी तब्बूला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला होता.
तब्बूने कधीच जॅकी श्रॉफसोबत काम केलं नाही
यावेळी डॅनी यांनी परिस्थिती हाताळत जॅकीला तब्बूपासून दूर नेलं. दुसऱ्या दिवशी तब्बूच्या बहिणीने या वरून मोठा वाद घातला होता. फराहने माध्यमांसमोर थेट जॅकी यांच्याबद्दल तक्रार केली होती. नंतर हे प्रकरण गैरसमज असल्याचं म्हणत मिटवण्यात आलं होतं. मात्र, अभिनेत्री तब्बूने तिच्या करिअरमध्ये कधीच जॅकी श्रॉफसोबत काम केलं नाही.
अभिनेत्री तब्बूने (Actress Tabu) वयाच्या 11 व्या वर्षी ‘बाजार’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंततर तिने वयाच्या 14 व्या वर्षी ‘हम नौजवान’ या चित्रपटात देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘विजयपथ’ या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.






