सोलापुरातील डॉ वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला संशयास्पद वळण, धक्कादायक खुलासा समोर

On: April 19, 2025 6:18 PM
Dr. Shirish Valsangkar Death Case
---Advertisement---

Dr Shirish Valsangkar suicide | सोलापूरचे नामवंत न्युरोसर्जन (Dr Shirish Valsangkar suicide) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले असतानाच आता या प्रकरणाला नवे आणि संशयास्पद वळण मिळाले आहे. त्यांनी आत्महत्येच्या वेळी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन वेळा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्येपूर्वी दोन वेळा रिव्हॉल्व्हर… 

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. वळसंगकर यांनी आपल्या घरातील वॉशरूममध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र प्राथमिक तपासानुसार त्यांनी पहिली गोळी झाडली ती चुकली आणि नंतर दुसऱ्या गोळीने स्वतःचा अंत केला. ही बाब प्रकरणाला गंभीर वळण देणारी ठरू शकते. सध्या (Solapur City Police) सोलापूर पोलीस विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेहाचे पोस्टमार्टम पूर्ण झाले असून पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी आता चौकशीचा फोकस कुटुंबातील सदस्यांकडे वळवला आहे. चार दिवसांनंतर त्यांची अधिकृत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘या’ कारणाने संशय वाढला 

डॉ. वळसंगकर यांनी आपले अखेरचे क्षण आपल्या (Valsangkar Hospital) हॉस्पिटलमध्ये व्यतीत केले. त्यांच्यावर उपचारसाठी दोन कार्डियोलॉजिस्ट, न्युरोलॉजिस्ट, न्युरोसर्जन, भूलतज्ज्ञ यांच्यासह सुमारे दहा डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. मात्र एक तास प्रयत्न करूनही शरीराने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तपास पूर्ण होईपर्यंत निश्चित कारण स्पष्ट होणार नाही. त्यांच्या निधनामुळे सोलापूरसह राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. वळसंगकर यांचे बालपणीचे मित्र आणि नेत्रतज्ज्ञ (Dr. Rajiv Pradhan) डॉ. राजीव प्रधान यांनी त्यांच्या आठवणी जागवताना सांगितले, “शिरीष हा ठरवलेली गोष्ट पूर्ण केल्याशिवाय थांबत नसे. आमचं मेडिकल कॉलेजमधील नातं फार जवळचं होतं. त्याचं जाणं खूप दु:खद आहे.”

तपासाअंती उघड होणार सत्य

दरम्यान, सोलापूर पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या प्रत्येक बाजूने तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादाचा धागा, दोन वेळा झालेला गोळीबार, सुसाइड नोटचा अभाव – हे सगळं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनवत आहे. येत्या दिवसांत कुटुंबीयांची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांद्वारे प्रकरणाचा खरा मागोवा लागेल, अशी अपेक्षा आहे.

Title : Dr Shirish Valsangkar suicide Doubts Rise Over Two Shots

 

Join WhatsApp Group

Join Now