अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात ग्रामस्थ आक्रमक! घेतला ‘हा’ कठोर निर्णय

On: February 23, 2026 11:27 AM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या या अपघातानंतर शोककळा पसरली असून घटनेमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. अधिकृत चौकशी सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थांनीही मोठा निर्णय घेतला आहे.

अपघाताची घटना आणि संशयाचे सावट :

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी सकाळी 8.10 वाजता मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळाजवळ पोहोचण्याआधीच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमधून दुर्घटनेची तीव्रता स्पष्ट झाली. काही वेळातच अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि राज्यभर शोककळा पसरली. आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बारामतीकडे धावले. (Ajit Pawar Plane Crash)

दरम्यान, या अपघाताचा तपास सुरू असला तरी तो केवळ अपघात होता की घातपात, यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर दावे केले. त्यांनी VSR कंपनी (VSR Company) संदर्भात आरोप मांडले. अजित पवार हे याच कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते आणि त्याच विमानाचा अपघात झाला. तसेच दुर्घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीची माहिती पवार कुटुंबातील इतर सदस्यांना नसल्याचे समोर आले आहे.

Ajit Pawar Plane Crash | सखोल चौकशीची मागणी आणि गावबंद :

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील डोरलेवाडी (Dorlewadi) गावातील ग्रामस्थांनी यासाठी आज बंदचे आवाहन केले. अपघात की घातपात या प्रश्नामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी राज्य सरकारने तातडीने सर्व बाजूंनी चौकशी करावी, अशी भूमिका घेतली आहे.

घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकताना स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या दुर्घटनेमागील कारणांबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा लागली आहे. राज्य सरकारने या अपघाताची सर्वंकष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी अधिक तीव्र होत चालली आहे.

News title : Dorlewadi Shutdown After Ajit Pawar Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now