डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला; केली मोठी घोषणा

On: October 7, 2025 12:28 PM
---Advertisement---

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ (Tariff) धोरणाबद्दल नेहमीच अनिश्चितता असते. या धोरणाविरोधात अनेक देश आता मैदानात उतरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राझीलने (Brazil) अमेरिकेला थेट इशारा दिला होता की त्यांचे आणि अमेरिकेचे आता कोणतेही संबंध राहिलेले नाहीत. आता ट्रम्प यांनी मध्यम आणि अवजड ट्रकवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

मध्यम आणि अवजड ट्रकवर २५ टक्के टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यम आणि अवजड ट्रकवर (Heavy and Medium Trucks) तब्बल २५ टक्के टॅरिफ (Tariff) लावण्याची घोषणा केली आहे. हा टॅरिफ (Tariff) १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. यापूर्वी हा टॅरिफ (Tariff) १ ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता, परंतु अधिकारी आणि पुरवठादारांनी (Suppliers) चिंता व्यक्त केल्याने त्याची मुदत पुढे ढकलण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली. अमेरिकन (American) उत्पादकांना (Producers) परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचा थेट परिणाम अमेरिकेत (America) आयात (Import) होणाऱ्या ट्रक उत्पादनावर (Truck Production) होईल. अनेक देश अमेरिकेत ट्रक आणि त्याचे पार्ट निर्यात (Export) करतात, परंतु त्यामुळे अमेरिकेत बनणाऱ्या ट्रकची मागणी घटल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेतील व्यापाराला संधी देण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की, अमेरिकेतील व्यापाराला (Trade) संधी देण्यासाठी (Opportunity) आपण हा निर्णय घेत आहोत. अमेरिकन (American) उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून (Foreign Competition) वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांनी असे म्हटले होते की, राष्ट्रीय सुरक्षेमुळेच (National Security) १ ऑक्टोबरपासून जड ट्रक (Heavy Trucks) आयातीवरील कर (Import Tax) लागू करत आहेत, परंतु आता त्यांनी त्यांचे विधान पूर्णपणे बदलले आहे.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले होते की, टॅरिफ (Tariff) हा माझा सर्वात आवडता शब्द आहे. टॅरिफमुळे अगदी कमी काळात आपण श्रीमंत होऊ शकतो. अमेरिकेत (America) यापूर्वी कधीही जितका पैसा आला नाही, त्यापेक्षा अधिक पैसा येत आहे. काही देश फक्त आपल्याकडून फायदा करून घ्यायचे आणि त्या बदल्यात आपल्याला काहीच देत नसत, अशांना हा मोठा धडा आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.

News Title- Donald Trump’s Major Tariff Decision

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now