महावितरणाच्या नवीन नियमावलीमुळे घरगुती वीजग्राहकांना ‘शॉक’!

On: February 18, 2025 10:42 AM
Electricity Rates
---Advertisement---

Electricity Bill | ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करणाऱ्या आयटी इंजिनिअर्स (IT Engineers), डॉक्टर (Doctor), वकील (Lawyer), सीए (CA) यांना निवासी सदनिकेतून काम करणे आता महागात पडणार आहे. महावितरणकडून (Mahavitaran) त्यांना व्यावसायिक वीज बिल (Commercial Electricity Bill) आकारले जाणार आहे. मात्र, या धोरणामुळे केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’ला (Pradhan Mantri Suryaghar Yojana) हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ‘द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशन’ (The Solar System Integrators Association) आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ने (Maharashtra Solar Manufacturing Association) सोमवारी केला. (Electricity Bill)

‘महावितरण’च्या (Mahavitaran) नवीन नियमावलीला विरोध

‘महावितरण’च्या (Mahavitaran) सर्व ग्राहकांना स्मार्ट ‘नेट मीटर’ (Net Meter) बसविण्यात येणार असून, ते टीओडी (टाइम ऑफ डे मीटर) (Time of Day Meter – TOD) असतील. ‘टीओडी’ मीटर देऊन त्यांच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे; परिणामी त्यांचे वीजबिल शून्य न होता, नेहमीप्रमाणेच ते भरावे लागणार आहे.

‘सूर्यघर योजने’च्या मूळ उद्देशाला धक्का लावण्याचे काम या ‘टीओडी’ मीटरच्या माध्यमातून होणार आहे,’ अशी भूमिका ‘द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशन’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयेश अकोले (Jayesh Akole) यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे (मास्मा) (MASMA) अध्यक्ष शशिकांत वाकडे (Shashikant Wakade) आणि इतर संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

‘महावितरण’ने (Mahavitaran) नव्या जाचक अटी दाखवून त्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर 26 फेब्रुवारीपासून मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik) येथे सुनावणी होणार आहे. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी दिलेली वेबसाइट (Website) कार्यान्वित होत नाही, असेही त्यांनी सांगितले. (Electricity Bill)

‘महावितरण’च्या (Mahavitaran) नव्या नियमावलीविरोधात मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे, असेही संघटनेने स्पष्ट केले.

Title : domestic electricity consumers shocked electricity bill will increase

 

Join WhatsApp Group

Join Now