केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ‘त्या’ महिला डॉक्टरवर मोठी कारवाई! धक्कादायक कारण आलं समोर

On: July 1, 2026 1:10 PM
Ketan Agarwal
---Advertisement---

Ketan Agarwal | देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणाशी संबंधित सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे एका महिला डॉक्टरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केतनच्या मृत्यूची थट्टा करणारी पोस्ट केल्याप्रकरणी ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (All India Dental Students and Surgeons Association – AIDSA) ने डॉ. मुस्कान सोनी (Dr. Muskan Soni) यांना पाच वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे कठोर कारवाई :

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सोशल मीडियावर काही व्यक्तींनी असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. त्यात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील दंतचिकित्सक आणि AIDSA च्या खजिनदार असलेल्या डॉ. मुस्कान सोनी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर केतनच्या मृत्यूबाबत वादग्रस्त स्टोरी पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी हसणाऱ्या इमोजींचा वापर करत घटनेची थट्टा केली होती. तसेच, “तुम्ही जर असं खोटं बोलाल, तर मरालच ना,” अशा आशयाची टिप्पणीही त्यांनी केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत AIDSA ने संबंधित कृत्य हे वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिक मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे स्पष्ट केले. संस्थेच्या मते, डॉक्टरांकडून समाजाप्रती संवेदनशील आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. एखाद्या व्यक्तीच्या दुःखद मृत्यूची सार्वजनिकरीत्या थट्टा करणे हे केवळ शिस्तभंगाचे प्रकरण नसून संस्थेच्या प्रतिष्ठेलाही धक्का देणारे आहे. त्यामुळे तातडीने शिस्तभंगाची कारवाई करत डॉ. मुस्कान सोनी यांना पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

Ketan Agarwal | पाच वर्षे सर्व अधिकार रद्द; हत्या प्रकरणाचा तपास सुरू :

संस्थेने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील पाच वर्षे डॉ. मुस्कान सोनी यांना पूर्णपणे ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या कालावधीत त्यांना संस्थेतील कोणतेही पद धारण करता येणार नाही. तसेच कोअर कमिटीचे सदस्य म्हणून काम करण्याचा, सामान्य सदस्यत्वाचा लाभ घेण्याचा किंवा संस्थेच्या कोणत्याही अधिकृत बैठका, परिसंवाद आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा अधिकारही राहणार नाही.

याशिवाय पुढील पाच वर्षांत संस्थेअंतर्गत होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या असंवेदनशील वर्तनाला आळा बसावा आणि समाजात योग्य संदेश जावा, या उद्देशाने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

News Title: Doctor Suspended in Ketan Agrwal Murder Row

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now