ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून मोठा खुलासा!

On: July 16, 2025 2:47 PM
dnyaneshwari munde
---Advertisement---

Dnyaneshwari Munde | परळीतील (Parli) व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्येला १८ महिने उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने, त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना तातडीने बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

माझ्या सिंदूरला न्याय द्या-

दिवसभरात मुंडे (Dnyaneshwari Munde) कुटुंबीयांनी न्यायासाठी तीव्र आंदोलन केले. सकाळी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, जो पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला. त्यानंतर, त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन “माझ्या सिंदूरला न्याय द्या,” अशी आर्त मागणी केली. मात्र, या भेटीनंतर गाडीत बसल्यावर ज्ञानेश्वरी यांनी विष प्राशन केले, ज्यामुळे त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महादेव मुंडे यांची २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या १८ महिन्यांत या प्रकरणाचा तपास सात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी केला, तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत. तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याने मुंडे कुटुंबीय हताश झाले होते. ज्ञानेश्वरी यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यातही या प्रकरणी सीआयडी (CID) किंवा एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली होती.

सुरेश धस यांनी केले आरोप-

पोलीस अधीक्षकांनी आता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याचा आरोपही यापूर्वी झाला आहे. हत्येतील आरोपी हे राजकीय नेते वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्या मुलाच्या अवतीभवती फिरत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता, ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली आहे.

News Title – Dnyaneshwari Munde health update

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now