डोक्याला गंभीर इजा, हात-पाय व छातीवर…; दिशा सालियन पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर

On: March 27, 2025 8:15 AM
Disha Salian postmortem report
---Advertisement---

Disha Salian | दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या वडिलांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये जखमांचे गंभीर तपशील उघड

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा ही आत्महत्या असल्याचं म्हटलं गेलं. मात्र आता तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये गंभीर जखमा असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्या डोक्याला मोठ्या स्वरूपाची इजा झाल्याचं नमूद करण्यात आलं असून, तोंड आणि नाकातून रक्तस्त्रावही झाल्याची नोंद आहे.

या अहवालानुसार, दिशाच्या हातावर, पायावर आणि छातीजवळही जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व जखमा आकस्मिक पडल्यामुळे झाल्या की त्या इतर कोणत्यातरी घटनेमुळे झाल्या, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचं गूढ आणखी गहिरं झालं आहे.

वडिलांनी कोर्टात दाखल केली याचिका

या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम 2 दिवसांनी, म्हणजेच 11 जूनला करण्यात आले. बोरिवलीतील पोस्टमोर्टम सेंटरमध्ये ही प्रक्रिया पार पडली. या विलंबामुळेही अनेक संशय व्यक्त करण्यात आले.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सुपूर्त करण्याचीही मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे सत्य दडपलं जात आहे.

दिशाच्या मृत्यूची चौकशी पूर्वीही झाली होती, मात्र तिच्या कुटुंबियांनी अधिक तपास आणि न्यायाची मागणी कायम ठेवली आहे. आता तिचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

 Title : Disha Salian postmortem report Reveals Shocking Injuries

 

Join WhatsApp Group

Join Now