मंत्री धनंजय मुंडेंच्या संपत्तीत 5 वर्षात झाली दुप्पट वाढ, आता एकूण संपत्ती किती?

On: October 25, 2024 12:48 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde | अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळीमधून विधानसभेसाठी उभे राहिले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज भरताना कोणतंही शक्तीप्रदर्शन केलं नाही. यावेळी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे देखील बंधु धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यासोबत उपस्थित होत्या.

उमेदवारी अर्ज भरताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिलं आहे. यातून त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास 53.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

धनंजय मुंडे यांची संपत्ती

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. तर 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आलीये. (Dhananjay Munde )

गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 31 कोटी रुपयांची वाढ झाली.धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. त्यात टँकर पासून बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा समावेश आहे. तसेच सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने देखील आहे. (Dhananjay Munde )

News Title :  Dhananjay Munde Net Worth

महत्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ 13 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार!

अजित पवारांची तुफानी खेळी! वडगाव शेरीतून उतरवला बडा नेता मैदानात

आदित्य ठाकरेंकडे एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून थक्क व्हाल

मोठी बातमी! अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Join WhatsApp Group

Join Now