आदित्य ठाकरेंकडे एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून थक्क व्हाल

On: October 25, 2024 10:49 AM
Aditya Thackeray
---Advertisement---

Aaditya Thackeray | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्ष व आघाड्यांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. अनेक उमेदवारांनी आपले अर्ज देखील दाखल केले आहेत. यातून त्यांच्या मालमत्तेबाबतचा तपशील समोर येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील काल, 24 ऑक्टोबररोजी आपला उमेदवारी अर्ज भरला. (Aaditya Thackeray)

यासोबतच भाजपाचे राजन विचारे, मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड अशा काही नेत्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यात आदित्य ठाकरेंच्या मालमत्तेचा आकडा समोर आला आहे.

आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती

गेल्या 5 वर्षांत आदित्य ठाकरे यांच्या मालमत्तेमध्ये एकूण 6 कोटींची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये त्यांनी वरळीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत देखील आदित्य ठाकरे यांना वरळीमधूळ उमेदवारी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांपूर्वी वैयक्तिक एकूण मालमत्ता ही 17 कोटी 69 लाख रुपये इतकी होती. यावेळी त्यांच्या मालमत्तेमध्ये बरीच वाढ झाली असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण वैयक्तिक मालमत्ता ही सध्या 23 कोटी 43 लाख इतकी आहे. (Aaditya Thackeray)

एक गुन्हा दाखल

यामध्ये स्थावर मालमत्ता ही 6 कोटी 4 लाखांची आहे, तर जंगम मालमत्ता 17 कोटी 39 लाख इतकी आहे.गेल्या 5 वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीमध्ये 6 कोटींची वाढ झाली आहे. त्यांनी विधि शाखेची पदवी देखील घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यावर एक गुन्हा देखील दाखल आहे. आदित्य ठाकरेंवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा एक गुन्हा दाखल आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असणारे दिवाणी वा फौजदारी गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक असतं.आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपशील प्रतिज्ञापत्रात दिला आहे. (Aaditya Thackeray)

News Title : Aaditya Thackeray Net Worth

महत्वाच्या बातम्या-

मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?, मोठी माहिती समोर

कॉँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, 48 नावांची झाली घोषणा!

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार अत्यंत शुभ; मिळणार पद, पैसा आणि प्रतिष्ठा

मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Join WhatsApp Group

Join Now