Devendra Fadnavis | पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मरलीधर मोहोळ यांचा जोरदार प्रचार पार पडला. मोहोळांना पाठिंबा देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. एवढंच नाही तर महायुतीच्या बड्या नेत्यांनी देखील पुण्यात येऊन मोहोळ यांचा प्रचार केला. यावेळी महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यातील गोखलेनगर येथे सभा घेतली. दरम्यान, सभेत बोलत असताना फडणवीस Love You Too म्हणाले त्यामुळे एकच हशा पिकला.
नेमकं काय घडलं?
पुण्यात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यकर्ते सभेत जोरजोरात घोषणाबाजी करत होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यकर्त्याने I Love You देवेंद्रजी असं म्हटलं.
परंतू फडणवीसांना ते ऐकू गेलं नसल्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्ता ओरडला I Love You त्यावर देवेंद्र फडणवीस Love You Too असं म्हणाले. फडणवीसांनी दिलेल्या उत्तरामुळे भरसभेत हशा पिकला. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
सभेत फडणवीस काय म्हणाले?
सभेत बोलत असताना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुणेकरांना काही अश्वासनं दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, पुण्यात एक स्थानकावरून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट असण्याची गरज आहे. रिंग रोडसाठी जमीन अधिग्रहण मोठ्या प्रमाणात झालं आहे. शहरापासून एमआयडीसीपर्यंत जाण्यासाठी डबल डेकर रोड आगामी काळात तयार करणार आहोत. शहराच्या बाहेर पडताना वाहतूक कोंडी मोठी होत असते.
सोशल मीडियावर प्रचार-
मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील जोरदार प्रचार सुरु आहे. आपल्या अधिकृत अकाउंटवर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचार केलेेले व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केले आहेत. मोहोळ यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. युवकांनी कमेंट्स करत लिहिलंय की, ‘भावी खासदार आमचे अन्ना…’ तर ‘सर्व सामान्य व्यक्तिमत्व सर्व सामान्यांचा नेता मुरली अण्णा मोहोळ’ असं म्हटलं आहे.
News Title : Devendra Fadnavis reply love you too
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत
“फडणवीस राजकारणातील कच्च मडकं, त्यांना..”; संजय राऊतांची खोचक टीका
वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल!
बीडच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
“भाजपने तिला भुंकण्यासाठी पाठवलं”, इम्तियाज जलील यांचा नवनीत राणांवर पलटवार






