फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क

On: October 26, 2024 2:42 PM
Maharashtra Gunthewari Law
---Advertisement---

Devendra Fadnavis Net Worth l विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्र देखील दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे तब्बल 13 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस ‘इतक्या’ कोटींचे मालक :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिलीय आहे. अशातच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्ब्ल 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपये इतकी संपत्ती आहे.तर देवेंद्र फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार, 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये इतके आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2022-2023 मध्ये हा आकडा 92 लाख 48 हजार 094 रुपये इतका होता. तर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती तब्बल 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपये तर मुलगीची संपत्ती ही 10 लाख 22 हजार 113 रुपये असल्याचे गाडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

Devendra Fadnavis Net Worth l फडणवीस यांची गुंतवणूक किती? :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अवघे 23 हजार 500 रुपये रोख रक्कम तर पत्नी अमृता यांच्याकडे 10 हजार रुपये रोख रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात तब्बल 2 लाख 28 हजार 760 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या खात्यात 1 लाख 43 हजार 717 रुपये आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात 20 लाख 70 हजार 607 रुपये गुंतवले आहेत. तर अमृता फडणवीस यांनी म्यूचल फंड आदी मध्ये मिळून 5 कोटी 62 लाख 59 हजार 031 रुपये गुंतवणूक केले आहेत

याशिवाय अमृता फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 32 लाख 85 हजार इतकी आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे 65 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असल्याचे समोर आले आहे.

News Title – Devendra Fadnavis Net Worth

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 जणांना मिळालं विधानसभेचं तिकीट

मनसेने चौथी यादी केली जाहीर! पाहा कोणाला मिळाली उमेदवारी?

शिंदे गटातील ‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षात दहापटीने वाढली!

न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now