“…तर मी निवृत्ती घेतली असती”; देवेंद्र फडणवीसांचं सर्वांत मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis | लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होत आहे. चार टप्प्याचं मतदान झालंय तर, पाचवा आणि अखेरचा टप्पा आता 20 मेला होईल. त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना फडणवीस यांनी थेट निवृत्तीबाबत विधान केलंय. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत फडणवीस यांनी हे विधान केलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुलाखतीमध्ये फडणवीस यांना मुंबईमध्ये मुस्लिम मते ही ठाकरेंच्या बाजूने शिफ्ट होत आहेत, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल?, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय.”, असं फडणवीस (Devendra Fadnavis ) म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे?, अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरावं लागेल, तर मी निवृत्ती घेतली असती.”,असं म्हणत देवेद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी ठाकरेंचा स्टार प्रचारक”

आता फडणवीस यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

आता फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल. राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

News Title – Devendra Fadnavis big Statement

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?

मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट

“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा

“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य