कोण पास, कोण नापास? फडणवीसांच्या रिपोर्ट कार्डमुळे मंत्र्यांचे धाबे दणाणले

On: January 26, 2026 3:36 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | राज्यातील प्रशासन डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत मंत्रालयातील ५७ विभाग आणि विविध शासकीय मंडळांचे कामकाज तपासण्यात आले. या ‘परीक्षेत’ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने अव्वल कामगिरी करत सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. (Devendra Fadnavis Governance Results)

या उपक्रमामागचा उद्देश प्रशासनात वेग, पारदर्शकता आणि जबाबदारी निर्माण करणे हा होता. फाईल्सचा प्रवास, ऑनलाइन सेवा, कामकाजातील डिजिटल शिस्त आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट निरीक्षण या निकषांवर प्रत्येक विभागाला गुण देण्यात आले. त्यामुळे कोणते खाते सुपरफास्ट आहे आणि कुठे सुधारणा आवश्यक आहे, याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाची बाजी :

शासकीय मंडळे आणि कंपन्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने डिजिटल कामकाजात उल्लेखनीय सुधारणा केल्याचे दिसून आले. याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एमएमआरडीए आणि पीएमआरडीए यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या निकालामुळे शासकीय मंडळांमध्ये डिजिटल परिवर्तनाची स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शासनाच्या या मूल्यांकनामुळे कार्यालयीन कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Devendra Fadnavis | सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वल :

मंत्रालयीन विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विभागाने सर्वाधिक गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. रस्ते विकास, पायाभूत सुविधा आणि ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर यामुळे हा विभाग आघाडीवर राहिला. तसेच, तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखल्याबद्दल नाशिक पोलीस आयुक्तालयाने राज्यातील पोलीस विभागांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. (Maharashtra E-Governance Ranking)

या १५० दिवसांच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागप्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे. ई-गव्हर्नन्समुळे सामान्य नागरिकांची कामे अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने होतील, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

News Title: Devendra Fadnavis Announces Ministers’ E-Governance Results, PWD and MMB Top the Rankings

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now