शेतकरी कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी अपडेट! जाणून घ्या एका क्लिकवर

On: July 21, 2026 1:12 PM
Farmer Loan Waiver
---Advertisement---

Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेविषयी महत्त्वाची माहिती देत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. राज्यात 30 जुलैपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे पाऊल टाकले आहे. अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेची तयारी बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) करत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

याचवेळी मुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचाही उल्लेख केला. या प्रदर्शनातून त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास, कार्यशैली, व्यक्तिमत्त्व, हसतमुख स्वभाव आणि कठोर निर्णयक्षमता यांचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याची ही एक चांगली संधी असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

Farmer Loan Waiver | दिल्लीतील आंदोलनावरही केली प्रतिक्रिया :

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केले. कोणतेही आंदोलन सुरू असताना काही प्रवृत्ती त्यामध्ये शिरून स्वतःचे राजकीय किंवा वैयक्तिक हित साधण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनात काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलनाचे स्पष्ट नेतृत्व नसल्याने परिस्थिती भरकटल्याचे त्यांनी म्हटले.

आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत पोलिसांनी योग्य वेळी परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर गंभीर परिणाम झाले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र सर्व आंदोलकांवर आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही जण चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले असतील, तर काहींनी स्वार्थासाठी त्याचा वापर केला, असे त्यांनी सांगितले. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आंदोलकांबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, त्यांनी नेमके काय म्हटले याची माहिती नसल्याचे सांगत त्यावर भाष्य करण्यास फडणवीस यांनी नकार दिला.

News Title: Devendra Fadnavis Announces Loan Waiver List

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now