उन्हाळ्यात रोज डिटॉक्स वॉटर पिताय?, अतिसेवन ठरू शकते घातक

On: March 6, 2025 10:14 AM
Detox Water Side Effects
---Advertisement---

Detox Water Side Effects | डिटॉक्स वॉटर सध्या आरोग्यप्रेमींसाठी एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. याच्या मदतीने वजन कमी करण्यासह शरीर निरोगी ठेवण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात तर याचे सेवन रोज केले जाते.  मात्र, याच्या आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतात, त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.  (Detox Water Side Effects)

डिटॉक्स का गरजेचे आहे?

आठवड्यातून किमान एकदा शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकल्याने किडनी, त्वचा आणि फुफ्फुस निरोगी राहतात. तसेच शरीर आणि मन ताजेतवाने होऊन अधिक ऊर्जावान राहते. यासाठी डिटॉक्स वॉटर अधिक फायदेशीर ठरते. मात्र, योग्य प्रमाणातच त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

अधिक प्रमाणात सेवन केल्यास होऊ शकते नुकसान

अतिरेक कशाचाही चांगला नसतो. तसेच डिटॉक्स वॉटर जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. डिटॉक्स वॉटरमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि त्वचा अधिक चमकदार होते. मात्र, वेगाने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात किंवा जास्त फायदे मिळवण्याच्या इच्छेने त्याचे  अधिक सेवन केल्यास शरीराच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो. (Detox Water Side Effects)

डिटॉक्स वॉटर अधिक प्रमाणात प्यायल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा वाढू शकते, ज्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी असंतुलित होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, थकवा, उलटी, चक्कर येणे आणि भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते.

पाणी आणि डिटॉक्स वॉटरची अदलाबदल करू नका

डिटॉक्स वॉटर पोषणदृष्ट्या समृद्ध असले तरी ते पाण्याच्या ऐवजी सतत पिणे योग्य नाही. साधे पाणी शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे रोज 1-2 लिटरहून अधिक डिटॉक्स वॉटर पिऊ नये. तसेच डिटॉक्स वॉटर तयार करताना योग्य आणि ताजे फळे आणि भाज्यांचा वापर करावा.

Title :  Detox Water Side Effects

 

Join WhatsApp Group

Join Now