महिलांना सरकारकडून मिळणार वर्षाला 30,000 रुपये! ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरु

On: July 29, 2026 12:08 PM
Women Scheme
---Advertisement---

Women Scheme | महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत दिल्ली (Delhi) सरकारने महिलांसाठी नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2,500 म्हणजेच वर्षभरात 30,000 आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी सरकारने स्वतंत्र निधीचीही तरतूद केली आहे.

दरमहा 2,500 मदत; 1 ऑगस्टपासून अर्ज :

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी दिल्ली सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 2,500 जमा केले जाणार असून वर्षभरात त्यांना एकूण 30,000 मिळतील. घरगुती खर्च, वैयक्तिक गरजा आणि भविष्यासाठी बचत करण्याच्या उद्देशाने ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारने 5,110 कोटींच्या अर्थसंकल्पाची तरतूद केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करत ही घोषणा केली आहे. रक्षाबंधनपर्यंत सुमारे 17 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Women Scheme | पात्रतेसाठी सरकारने ठेवल्या महत्त्वाच्या अटी :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील केवळ एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय अर्जदार महिला किंवा तिचा पती अथवा आई-वडील किमान 10 वर्षांपासून दिल्लीचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य जीएसटी भरत नसावा. तीनपेक्षा अधिक मुले असलेल्या महिलांना या योजनेसाठी पात्रता मिळणार नाही. महिन्याला 2,400 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या कुटुंबांतील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच चारचाकी वाहन असलेले कुटुंब, आधीपासून इतर सरकारी योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी, सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, आयकरदाते आणि जीएसटी भरणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. दरम्यान, महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण (Ladki Bahin) योजना सुरू केली आहे.

News Title: Delhi Women ₹30000 Assistance Scheme

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now