दिल्लीतील जिमवर गोळीबार; गायक गुरू रंधावा निशाण्यावर? व्हायरल पोस्टने खळबळ

On: June 11, 2026 11:38 AM
Guru Randhawa
---Advertisement---

Delhi Gym Firing | दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात गुरुवारी पहाटे एका जिमबाहेर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली. मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी जिमच्या बाहेर गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे पंजाबी गायक गुरू रंधावाचं नाव चर्चेत आले आहे.

व्हायरल पोस्टमुळे वाढल्या चर्चांना उधाण

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे ५ वाजता दोन युवक पश्चिम विहार (West Vihar) येथील 24 HS Fitness Gym समोर आले आणि त्यांनी कथितरित्या सात गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात घबराट पसरली आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनेनंतर सोशल मीडियावर अनिल पंडित यूएसए (Anil Pandit USA) या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) कडून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला. तसेच, संबंधित जिम ही पंजाबी गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) यांच्याशी संबंधित असल्याचे आणि ते सलमान खान (Salman Khan) यांच्या जवळ असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा उल्लेखही करण्यात आला.

पोलिस तपासात वेगळी माहिती

व्हायरल पोस्टमध्ये गुरू रंधावा (Guru Randhawa) यांच्याबाबत विविध दावे करण्यात आले असले, तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात या जिमचा त्यांच्याशी कोणताही थेट संबंध असल्याचे आढळून आलेले नाही. बाह्य दिल्ली पोलीस (Outer Delhi Police) सूत्रांच्या माहितीनुसार, ही जिम टागोर गार्डन (Tagore Garden) परिसरातील एका व्यक्तीच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे.

तपास यंत्रणा ही जिम फ्रँचायझी मॉडेलवर चालवली जात होती का आणि तिचा कोणत्याही सेलिब्रिटी किंवा व्यावसायिक ब्रँडशी संबंध आहे का, याचा तपास करत आहेत. त्यामुळे गुरू रंधावा यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

 Guru Randhawa
Guru Randhawa

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जिमच्या काचेचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनास्थळी गोळ्या लागल्याच्या खुणा आढळून आल्या असून तपास सुरू आहे.

ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते क्षेत्र थेट सीसीटीव्हीच्या नजरेत नसल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

News Title: Delhi Gym Firing Sparks Guru Randhawa Buzz

Join WhatsApp Group

Join Now