दिल्ली-गोवा एक्स्प्रेस आता थांबणार जेजुरीत; प्रवाशांना मोठा दिलासा

On: March 13, 2025 9:33 AM
Delhi-Goa Express to Halt at Jejuri from April
---Advertisement---

Delhi-Goa Express | पुणे ते कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वे स्थानकात (Jejuri Railway Station) हजरत निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस (Hazrat Nizamuddin-Goa Express) या लांब पल्ल्याच्या अतिजलद रेल्वेला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात थांबा मिळणार आहे. तसेच, सध्या कोल्हापूर ते पुणे धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस (Sahyadri Express) पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार आहे.

मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक धर्मवीर मीना, पुणे विभाग व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या (RPF) प्रियंका शर्मा यांनी जेजुरीतील माजी नगरसेविका अमिना पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे व ग्रामस्थांना ही माहिती दिली.

जेजुरी रेल्वे स्थानकाबाबत मागण्या

जेजुरी हे तीर्थक्षेत्र आणि औद्योगिक वसाहतीचे शहर आहे. रेल्वे स्थानकापासून केवळ 14 किमी अंतरावर अष्टविनायकातील पहिले स्थान मोरगाव आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गुजरात येथून भाविक येतात. मात्र, जेजुरीत थांबा नसल्याने भाविकभक्त व औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची गैरसोय होते.

प्रवाशांची गैरसोय दूर होणार

अखेर रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य करत पुढील महिन्यापासून दिल्ली-गोवा एक्स्प्रेस जेजुरीत थांबणार आहे. तसेच, सध्या सुरू असलेली कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार आहे, ज्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

दरम्यान, खंडेरायाचा पालखी सोहळा सोमवती अमावस्येच्या वेळी कऱ्हा नदी तीरावर स्नानासाठी व धार्मिक विधींसाठी जातो. हजारो भाविकांना धोकादायक पद्धतीने रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो. भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पालखी मार्गावर भुयारी मार्ग (Underpass) करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Title : Delhi-Goa Express to Halt at Jejuri from April

 

Join WhatsApp Group

Join Now