Delhi Election Results 2025 | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Election Results 2025) मतमोजणीत भाजपाने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे, तर आम आदमी पक्षाचे (AAP) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातून सत्ता निसटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सकाळी 10 वाजता हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसार, भाजप 44, आम आदमी पक्ष 26 जागांवर आघाडीवर होते. तर काँग्रेस (Congress) पूर्णपणे नामशेष झाली आहे. दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 36 जागांची आवश्यकता असल्याने भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने राजधानीत सत्ता मिळवली आहे. केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (Atishi) यांनी सत्तेचा गड टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण भाजपने मोठा विजय मिळवला.
आम आदमी पक्षाच्या पराभवामागील 5 प्रमुख कारणे
1. काँग्रेससोबत युती न करणे आणि मतांचे विभाजन
दिल्ली निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये युती झाली नाही. याचा फटका ‘आप’ला बसला. तसेच, असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या AIMIM पक्षामुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले. मुस्लिमबहुल भागांमध्येही भाजपने आघाडी घेतली, कारण ‘आप’ला युती न केल्याचा फटका बसला.
2. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठा धक्का
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार मोठा मुद्दा ठरला. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया (Manish Sisodia), सत्येंद्र जैन (Satyendra Jain) आणि संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि काही नेत्यांना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचाराविरोधात स्थापन झालेल्या पक्षाचे नेतेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये सापडल्याने मतदारांनी भाजपला पसंती दिली.
3. विकासाच्या अभावामुळे लोक नाराज
दिल्लीतील पायाभूत सुविधा आणि विकासकामांवर ‘आप’ सरकारने लक्ष दिले नाही, असा आरोप होता. नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला, पण ‘आप’चे नेते केंद्र सरकारला दोष देत राहिले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचा मुद्दा भाजपने प्रचारात उचलून धरला आणि जनता करदात्यांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप केला.
4. ‘मोफत सुविधां’पेक्षा भ्रष्टाचार आणि सरकारविरोधी लाट प्रभावी ठरली
निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल ‘मोफत’ सुविधांबाबत बोलत राहिले. पुजारी आणि ग्रंथींना पगार, महिलांना दरमहा 2100 रुपये अशा योजनांचे आश्वासन दिले. मात्र, दिल्लीकरांनी भ्रष्टाचार आणि विकासाच्या अभावाला महत्त्व दिले आणि भाजपला अधिक पसंती दिली.
5. रिक्षाचालक आणि महिलांची नाराजी
दिल्लीतील रिक्षाचालकांनी केजरीवाल यांच्यावर आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप केला. महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे, भाजपने मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये महिलांसाठी जाहीर केलेली आश्वासने पूर्ण केली. त्यामुळे भाजपकडे मोठ्या प्रमाणावर महिला मतदार वळल्याचे दिसले.
दिल्लीमध्ये ऐतिहासिक बदल
भाजपच्या विजयाने दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. आता भाजपचे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Delhi Election Results 2025)
Title : Delhi Election Results 2025 BJPs landslide victory in Delhi 5 reasons behind AAP defeat








