‘या’ अभिनेत्रीचा आणि दाऊदचा एक गुप्त मुलगा , ‘त्या’ व्यक्तीच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं!

On: April 21, 2025 6:03 PM
dawood ibrahim
---Advertisement---

Dawood Ibrahim | बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी (Actress Mandakini) ही तिच्या ‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili Movie) या गाजलेल्या चित्रपटामुळे ओळखली जाते. मात्र, तिच्या कारकिर्दीइतकीच तिचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सोबतचं नाव जोडलं गेलं आणि त्यावरून ती अनेक वेळा चर्चेत आली.

दाऊदशी नातं आणि गुप्त मुलाबाबतचे दावे-

१९९४ मध्ये एका क्रिकेट सामन्यात मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम एकत्र स्टेडियममध्ये दिसल्याचे फोटो समोर आले आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चांमुळे तिच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला. नंतरच्या काळात मंदाकिनीला चित्रपट मिळणं थांबलं आणि तिच्या कारकिर्दीचा आकस सुरू झाला.

२०१५ साली माजी पोलिस आयुक्त नीरज वर्मा यांनी ‘डायल डी फॉर डॉन’ (Dawood Ibrahim) या पुस्तकात असा दावा केला की मंदाकिनी आणि दाऊद यांचा एक गुप्त मुलगा आहे जो सध्या बंगळुरूमध्ये राहत आहे. या पुस्तकात दाऊदचे बॉलिवूडशी संबंध, त्याच्या तीन मुलाखती आणि अभिनेत्रीच्या बहिणीमार्फत त्या मुलाचे संगोपन होत असल्याची माहितीही नमूद करण्यात आली होती.

विवादांमुळे मंदाकिनीची कारकिर्द संपुष्टात-

पुस्तकात जरी त्या अभिनेत्रीचे नाव थेट नमूद केले नव्हते, तरी १८ वर्षांच्या एका अभिनेत्रीपासून दाऊदला मूल झाल्याचा उल्लेख होता. या बातम्या मंदाकिनीच्या नावाशी जोडल्या गेल्या. काही मीडिया अहवालांनुसार दाऊद तिच्यावर इतका प्रेम करत होता की, चित्रपट निर्मात्यांना तिला प्रमुख भूमिकांमध्ये घेण्यास भाग पाडत असे किंवा धमकावत असे. परिणामी, बॉलिवूडमधील अनेक निर्माते तिला काम देण्यास टाळू लागले आणि तिचं करिअर डगमगलं.

दाऊदसोबत नातं फेटाळणारी मंदाकिनी-

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद इब्राहिमचं नाव आल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींना मोठी प्रसिद्धी मिळाली. मंदाकिनी आणि दाऊद यांच्यातील जवळीकतेबाबत अफवा वाढल्या. मात्र, मंदाकिनीने या सगळ्या चर्चांना फाटा दिला. २०१० मध्ये ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, “लोक माझं नाव दाऊदशी जोडतात याचं मला दु:ख होतं. त्या गोष्टी आता भूतकाळातल्या आहेत.”

दाऊदशी संबंध नसल्याचा पुनःपुन्हा इन्कार करूनही, मुंबई बॉम्बस्फोटांच्या चौकशीत तिची चौकशी झाली. यानंतर तिला निर्दोष ठरवण्यात आलं, पण तिचं बॉलिवूडमधील करिअर पूर्णतः संपुष्टात आलं. सध्या मंदाकिनी अभिनयापासून दूर असून, अधूनमधून ती रिएलिटी शोज आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसते.

News Title – Dawood Ibrahim and bollywood actress have son

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now