क्रीडा विश्वात खळबळ! ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूला अटक

On: April 7, 2026 5:07 PM
David Warner Arrested
---Advertisement---

David Warner Arrested | पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धा सध्या विविध वादांमुळे चर्चेत आली आहे. स्पर्धेच्या आयोजनावर आधीपासूनच टीका होत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या Pakistan Super League 2026 हंगामात वॉर्नर खेळत असून त्याच्याकडे कराची किंग्स संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र स्पर्धेदरम्यानच त्याच्याशी संबंधित एक वादग्रस्त घटना घडल्याने चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं? :

मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर डेविड वॉर्नरने छोटासा ब्रेक घेतला होता. 3 एप्रिल रोजी तो ऑस्ट्रेलियाला परतला. याच काळात दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा आरोप त्याच्यावर झाला आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. (David Warner Arrested)

या घटनेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याच्या पुढील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

David Warner Arrested | आधीही वादात अडकला होता वॉर्नर :

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये डेविड वॉर्नर आणि इंग्लंडचा ऑलराउंडर Moeen Ali यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले होते. मात्र नंतर हा वाद वाढवून सांगितला जात असल्याचे सांगत दोन्ही बाजूंनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तरीही आता मैदानाबाहेरील या घटनेमुळे वॉर्नर पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणामुळे PSL स्पर्धेवरही प्रश्न उपस्थित केले जात असून पुढे या प्रकरणात काय घडते याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

News Title: David Warner Arrested During PSL 2026: Australian Cricketer Detained for Drunk Driving

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now