Daily horoscope | आज चैत्र शुद्ध द्वितीया आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचा पवित्र योग असल्याने काही राशींसाठी दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे. तर काहींसाठी आत्मपरीक्षण आणि संयमाची गरज आहे. जाणून घ्या तुमचं राशीभविष्य…(Daily horoscope)
आजचे राशीभविष्य
मेष (Aries):
वाहन चालवताना सतर्कता आवश्यक. मानसिक शांतता ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. जोडीदाराची साथ लाभेल, पण सावधगिरी बाळगा.
वृषभ (Taurus):
व्यवसायात प्रगतीचे संकेत. घरगुती अडचणी दूर होतील. आरोग्याबाबत दक्षता घ्या. संघर्ष टाळा, विनाकारण वादात पडू नका.
मिथुन (Gemini):
मित्रमंडळींशी संवाद वाढेल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष नको. आर्थिक गुंतवणुकीत विचारपूर्वक पावलं उचला. (Daily horoscope)
कर्क (Cancer):
भागीदारावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः निर्णय घ्या. प्रवास अपेक्षित. मानसिक स्थैर्य ठेवा आणि लहान गोष्टींचा विपर्यास टाळा.
सिंह (Leo):
कार्यक्षेत्रात सावधगिरी आवश्यक. गुप्त शत्रूंमुळे त्रास होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारात विशेष लक्ष ठेवा. वरिष्ठांशी संबंध बिघडू देऊ नका.
कन्या (Virgo):
शेजऱ्यांशी सलोखा ठेवा. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. धाडस करताना मर्यादा लक्षात ठेवा. प्रवासात लहान अडचणी संभवतात.
तूळ (Libra):
दिवस सकारात्मक जाईल. बुद्धी आणि मनाचा समतोल राखल्यास यश मिळेल. घरगुती वाद मिटवण्यावर भर द्या.
वृश्चिक (Scorpio):
किरकोळ अपघाताचा धोका. कामात चुकांपासून बचाव करा. उत्पन्न वाढवण्यासाठी नवे प्रयत्न फायदेशीर ठरतील.
धनू (Sagittarius):
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. संभाषण कौशल्याचा उपयोग होईल, पण चुकीच्या गैरसमजात अडकू नका. मनावर ताण जाणवू शकतो.
मकर (Capricorn):
कामात गती येईल. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. प्रवास टाळा. चिकाटी ठेवा. (Daily horoscope)
कुंभ (Aquarius):
नातेवाईकांशी वाद संभवतो. घरसजावटीसाठी खरेदी कराल. अध्यात्मिकदृष्ट्या दिवस अनुकूल. वारसामध्ये काही सकारात्मक घडामोडी घडतील. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मीन (Pisces):
मतांवर आग्रही राहाल. बोलण्यात धार येईल पण हेकेखोरपणाने वागू नका. प्रवासाचा आनंद लुटाल, पण मानसिक दडपण झटकून टाका.
Title : Daily Horoscope 31 March 2025






