Kabutarkhana Jain Protest | दादर – “आधी प्रार्थना… आता आंदोलन” अशा घोषणा देत जैन समाजाचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी सकाळी दादर येथील कबूतरखाना परिसरात एकत्र जमले. महापालिकेकडून टाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि पोलिस यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Kabutarkhana Jain Protest)
कोर्टाच्या आदेशानंतर कबूतरखान्यावर बंदी :
दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना बंद करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. कोर्टाने कबूतरांना अन्न टाकण्यावर बंदी घातली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेने कबूतरखान्यावर ताडपत्री टाकून प्रवेश अडवला.
मात्र, यावरून जैन समाज आक्रमक झाला. त्यांनी आधी प्रार्थना सभा घेण्याचे आणि नंतर आंदोलन रद्द केल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात त्यांनी कबूतरखान्यात प्रवेश करून ताडपत्री फाडली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Kabutarkhana Jain Protest)
Kabutarkhana Jain Protest | पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची :
– महिलाही कबूतरखान्याच्या आत उतरल्या
– ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न
– पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न
– परिसरात गोंधळाचे वातावरण
राजकीय पक्षांचा सरकारवर हल्लाबोल :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत महापालिकेला नियंत्रित पद्धतीने खाद्यपुरवठा सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जैन समाजाचा तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. (Kabutarkhana Jain Protest)
या वादावर सरकारचा काय पुढील निर्णय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पर्यायी खाद्यव्यवस्था पूर्ण होईपर्यंत काही प्रमाणात सूट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कोर्टाच्या आदेशामुळे यावर कायदेशीर मर्यादा आहेत.






