CSK vs PBKS | IPL 2026 स्पर्धेत आज क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा सामना रंगणार आहे. Chennai Super Kings आणि Punjab Kings हे दोन संघ शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा या मोसमातील हा दुसरा सामना असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहेत, तर पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर आहे. पहिल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला होता, तर चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नई विजयी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सामना कधी आणि कुठे होणार? :
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना शुक्रवार, 3 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंडवर म्हणजेच M. A. Chidambaram Stadium येथे होणार आहे. (Chennai vs Punjab Live Streaming)
या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल, तर 7 वाजता टॉस पार पडणार आहे. त्यामुळे संध्याकाळी क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
CSK vs PBKS | सामना लाईव्ह कुठे पाहता येणार? :
हा सामना टीव्हीवर Star Sports Network वर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तर मोबाईलवर चाहत्यांना सामना JioHotstar अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे.
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिली तर सामना अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 32 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी चेन्नईने 16 सामने जिंकले आहेत, तर पंजाबनेही 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. (Ruturaj Gaikwad CSK, Shreyas Iyer)
मात्र गेल्या 5 सामन्यांचा विचार केला तर पंजाब किंग्स वरचढ ठरले आहेत. पंजाबने गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले, तर चेन्नईला फक्त 1 विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






