MS Dhoni Stumping | आयपीएल 2025 चा तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला, मात्र या सामन्याचा खरा हायलाईट ठरला महेंद्रसिंह धोनी. अवघ्या 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला स्टंपिंग करत धोनीने पुन्हा एकदा आपली विकेटकीपिंग स्किल्सची जादू दाखवली. (MS Dhoni Stumping)
धोनीचा अचूक वेग आणि सूर्यकुमार आउट
मुंबई इंडियन्सचा डाव सुरू झाल्यापासून अडखळत होता. पहिल्या काही षटकांमध्ये तीन विकेट्स गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने सुरुवातीला काही चांगले फटके मारून 29 धावा केल्या. पण 11 व्या षटकात त्याने नूर अहमदच्या तिसऱ्या चेंडूवर क्रीज सोडून फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि धोनीने संधी साधली.
धोनीने चेंडू झेलताच फटाफट स्टंपिंग केली आणि सूर्यकुमारला काही समजण्यापूर्वीच बेल्स हवेत उडाल्या. ही स्टंपिंग फक्त 0.12 सेकंदात झाली होती – जे धोनीच्या अद्वितीय चपळतेचं उदाहरण ठरलं. 43 व्या वर्षीही धोनीची नजर आणि अचूकता तरुण विकेटकीपरलाही लाजवेल अशी होती.
चेन्नईचा दणदणीत विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरुवातच खराब झाली होती. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, तर रिकलटन आणि विल जॅक्स यांनाही फार काही करता आलं नाही. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने त्यालाही गार केले. तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या, पण इतर फलंदाज अपयशी ठरले.
मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 155 धावा केल्या. चेन्नईला 156 धावांचं लक्ष्य दिलं, जे त्यांनी सहज पूर्ण केलं. पण या सामन्याचं मुख्य आकर्षण म्हणजे धोनीने केलेली विस्मयकारक स्टंपिंग – ज्याने पुन्हा एकदा दाखवलं की “धोनी है तो मुमकीन है!”
Title : CSK vs MI MS Dhoni stumping of 0.12 Sec






