IPL संपताच चेन्नई सुपर किंग्स घेणार कठोर निर्णय! ‘या’ ५ खेळाडूंना मिळणार डच्चू

On: May 22, 2026 5:52 PM
Chennai Super Kings
---Advertisement---

Chennai Super Kings | आयपीएल (IPL) 2026 हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) फारसा यशस्वी ठरला नाही. स्पर्धेत काही संघांविरुद्ध विजय मिळवूनही संघाला केवळ 12 गुणांपर्यंत मजल मारता आली. या निराशाजनक कामगिरीनंतर आगामी हंगामासाठी संघ व्यवस्थापन मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही स्टार खेळाडूंना पुढील मोसमापूर्वी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

महागडे खेळाडूही रडारवर :

दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसकडून यंदाच्या हंगामात मोठ्या अपेक्षा होत्या. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्याला कायम ठेवले होते. मात्र, 11 सामन्यांमध्ये त्याला केवळ 151 धावा करता आल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 44 इतकी राहिली. अपेक्षित सातत्यपूर्ण कामगिरी न झाल्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत कठोर निर्णय घेऊ शकते.

याशिवाय प्रशांत वीर (Prashant Veer) याच्यावरही संघाची नाराजी असल्याची चर्चा आहे. चेन्नईने त्याला तब्बल 14.20 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. त्यामुळे तो या मोसमातील सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला होता. मात्र, त्याच्या कामगिरीने संघाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे पुढील हंगामापूर्वी त्याची सुटका केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chennai Super Kings | गोलंदाजांवरही गंडांतर :

डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गुरजपनेत सिंग (Gurjapneet Singh) याच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, त्यालाही विशेष प्रभाव टाकता आला नाही. त्याने या हंगामात 8 सामने खेळताना फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 9.26 इतका राहिल्याने संघ व्यवस्थापन समाधानी नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, खलील अहमद (Khaleel Ahmed) दुखापतग्रस्त झाल्यानंतर मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याच्यावर पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. हैदराबादविरुद्ध (Hyderabad) 21 धावांत 2 विकेट्स आणि लखनऊविरुद्ध (Lucknow) 24 धावांत 1 विकेट ही त्याची उल्लेखनीय कामगिरी ठरली. तरीही संपूर्ण हंगामात सातत्य राखण्यात त्याला अपयश आल्याने त्याच्याबाबतही पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

एकूणच, खराब हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आगामी आयपीएलपूर्वी संघरचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत संघातून अनेक मोठी नावे बाहेर पडू शकतात.

News title : CSK May Release Five Players

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now