पतीची हत्या करुन घरात लपवलं, रोज मृतदेहावर करायची अंघोळ; ‘असा’ उलगडला हत्येचा थरार

On: July 4, 2026 1:55 PM
Agra Crime News
---Advertisement---

Crime News | पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही महिला तब्बल 45 दिवस पती बेपत्ता असल्याचे नाटक करत होती. नातेवाईक आणि शेजाऱ्यांसमोर रडण्याचा आव आणत तिने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृताच्या भावाला आलेल्या संशयामुळे अखेर या हत्येचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपी पत्नी रुबी शर्मा हिला ताब्यात घेतले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मृत सुरेंद्र शर्मा (वय 44) हे पत्नी रुबी शर्मा आणि दोन मुलींसह आग्रा येथे राहत होते. 18 मे रोजी सुरेंद्र अचानक बेपत्ता झाल्याचे रुबीने सांगितले. काही दिवस शोधाशोध केल्यानंतर 26 मे रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. तक्रार दाखल केल्यानंतरही रुबी नातेवाईकांसोबत पतीचा शोध घेत असल्याचे नाटक करत होती.

दीराला आला संशय, उघड झाला कट

सुरेंद्र यांचा भाऊ अनिल शर्मा यांना रुबीच्या वागण्याबद्दल संशय येऊ लागला. सुरेंद्र बेपत्ता असतानाही त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

बाथरूममधील नव्या फरश्यांमुळे वाढला संशय

अनिल शर्मा यांच्या माहितीनंतर पोलिसांनी सुरेंद्र यांच्या घरात जाऊन चौकशी केली. यावेळी रुबीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने घराची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान बाथरूममध्ये नुकत्याच बसवलेल्या फरश्या आणि ताजे प्लास्टर पोलिसांच्या नजरेस पडले.

यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम सुरू केले. काही वेळातच जमिनीत पुरलेला सुरेंद्र यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

खिरीत झोपेच्या गोळ्या, बेशुद्ध होताच गळा आवळल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, 18 मे रोजी रुबीने सुरेंद्र यांना झोपेच्या गोळ्या मिसळलेली खीर खायला दिली. ते बेशुद्ध पडताच गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

दुसऱ्या दिवशी तिने दोन्ही मुलींना नातेवाईकांच्या घरी पाठवले. त्यानंतर घरातील बाथरूममध्ये खड्डा खणून मृतदेह पुरला आणि त्यावर नवीन फरश्या बसवल्या, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. मात्र, या सर्व बाबींना अंतिम पुष्टी तपास आणि फॉरेन्सिक पुराव्यानंतरच मिळणार आहे.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी रुबी शर्मा हिला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे. एवढा मोठा कट तिने एकटीने रचला की तिला इतर कोणाची मदत मिळाली, याचाही तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

News Title: crime news Wife Killed Husband in Agra Dead Body buries in Bathroom

Join WhatsApp Group

Join Now