शाळेतील भांडणाने घेतला जीव; एक बुक्की अन् मित्राचा जागेवरच मृत्यू

On: February 20, 2025 5:14 PM
Beed Crime News
---Advertisement---

Crime News | पश्चिम बंगालमधील (West Bengal) हुगळी येथील एका शाळेत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. (Crime News)

मुलाच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील गणेश जालान (Ganesh Jalan) म्हणाले, “शाळेत शिक्षक असताना विद्यार्थी कसे भांडू शकतात? शाळेत अभ्यास होत नाही का? माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे.” हे दोन्ही विद्यार्थी हुगळीच्या चंपदानी (Champdani) येथील आर्य विद्यापीठ शाळेत शिकत होते. दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर इतक्या भयंकर गुन्ह्यात होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता.

नेमके काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ग सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी सुरू झाली. अभिनव नावाच्या विद्यार्थ्याच्या छातीवर त्याच्या वर्गमित्राने जोरात बुक्का मारला. बुक्का लागताच अभिनव बेशुद्ध पडला.

शाळा प्रशासनाने (School Administration) तात्काळ अभिनवला जवळच्या खासगी रुग्णालयात (Private Hospital) नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शाळेच्या परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मृत विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी (Postmortem) पाठवला. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी विद्यार्थ्याला अटक करून मारामारीचे कारण शोधले जात आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी ते शाळेत नव्हते, माध्यमिक परीक्षेसाठी दुसऱ्या शाळेत गेले होते. (Crime News)

Title : Crime News Student Killed in School Fight in Hooghly 

 

Join WhatsApp Group

Join Now