Crime News | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी (Jhansi) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 4 वर्षांच्या मुलीने आपल्या आईच्या मृत्यूचे रहस्य उघड केले आहे. झाशीच्या (Jhansi) कोतवाली परिसरातील पंचवटी शिव परिवार कॉलनीत (Panchvati Shiv Parivar Colony) राहणाऱ्या 27 वर्षीय सोनाली बुधौलियाचा (Sonali Budhauliya) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.(Crime News)
पतीचा आत्महत्येचा दावा, मुलीने केला खुलासा
सोनालीचा पती संदीप बुधौलियाने (Sandeep Budhauliya) या घटनेला आत्महत्या म्हटले होते, पण त्याच्या 4 वर्षांच्या मुलीने जे सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मुलीने एका कागदावर चित्र काढून वडिलांनी तिच्या आईला कसे मारले आणि तिला लटकवले, हे सांगितले. सोनालीचा मृतदेह सापडल्यावर तिच्या पालकांनी तिचा पती आणि सासरच्यांवर तिची हत्या करून तिला लटकवल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
मुलीने रेखाटले चित्र
सोनालीच्या 4 वर्षांच्या मुलीने, दृश्यताने (Drishyata), नेमके काय घडले हे सांगितले. तिने कागदावर काढलेले चित्र पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले. चित्रात तिची आई फासावर लटकलेली होती, पण फाशाजवळ दुसरा हात दिसत होता. पोलिसांनी विचारले, “बेटा, हा हात कोणाचा आहे?” तेव्हा मुलीने उत्तर दिले, “पप्पांचा. पप्पांनी आधी मम्मीला मारलं आणि नंतर तिला लटकवलं.” मुलीने हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते.
पतीला अटक, चौकशी सुरू
पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Postmortem Report) आल्यानंतर सोनालीचा पती संदीप बुधौलियाला (Sandeep Budhauliya) अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने दावा केला की, दोघांमध्ये भांडण झाले होते आणि त्यामुळे सोनालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Crime News)
सोनालीच्या वडिलांचा आरोप
सोनालीच्या वडिलांनी सांगितले की, 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्नाच्या दिवशीच त्यांनी 20 लाख रुपये आणि अंगठी दिली होती. सोनालीच्या सासरच्यांनी लग्नादरम्यान वाद निर्माण केला होता. त्यानंतर त्यांनी कारची मागणी सुरू केली आणि यासाठी सासरचे लोक तिला नेहमी मारहाण करायचे. त्यांनी याबद्दल पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रारही केली होती. (Crime News)
Title : Crime News 4 Year Old Girl Reveals Mothers Murder in uttar pradesh






