बांधकाम कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय, दरमहा मिळणार ‘इतके’ हजार?

On: March 26, 2025 7:54 AM
Construction Workers Pension of 12K 
---Advertisement---

Construction Workers Pension | महायुती सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा करत नवीन निवृत्ती वेतन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील कामगारांना दरवर्षी 12,000 रुपयांचे पेन्शन मिळणार असून, यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. (Construction Workers Pension)

बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपयांची निवृत्ती पेन्शन

राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेनंतर आता बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी विधानसभेत जाहीर केले की, 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपयांचे निवृत्ती वेतन मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील लाखो कामगारांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या योजनेला तत्त्वतः मंजुरी दिली असून, लवकरच त्यासाठी सविस्तर एसओपी तयार करण्यात येणार आहे. विधानसभेत दोन्ही सभागृहांमध्ये ही घोषणा करण्यात आली. यामुळे कामगारांसाठी नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण होणार असून, त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल.

कामगार कल्याणासाठी डिजिटल युगाची सुरुवात

या नव्या योजनेबरोबरच, महाराष्ट्र सरकारने कामगार कल्याणाच्या प्रक्रियांना अधिक डिजिटल स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सेस पोर्टल, बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम (BMMS), आणि डिजीलॉकर आधारित प्रमाणपत्र प्रणालीचे उद्घाटन झाले.

या प्रणालीमुळे संपूर्ण राज्यभरातील सेस संकलन सुलभ होणार आहे आणि नोंदणीकृत कामगारांना अधिकाधिक योजनांचा लाभ मिळणार आहे. बॉयलर परीक्षांमध्ये उत्तीर्ण अभियंत्यांना डिजीलॉकरमार्फत प्रमाणपत्र मिळणार असून, पारदर्शकतेला चालना मिळेल. कामगार कायद्यातील सुधारणांमुळे माथाडी व खासगी सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या अडचणींवरही उपाय मिळणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कामगार विभागाच्या 100 दिवसांच्या उपक्रमांची स्तुती केली आणि या पुढाकारांमुळे राज्यातील कामगार कल्याणात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला.

Title : Construction Workers Pension of 12K 

 

Join WhatsApp Group

Join Now