Congress | विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल रविवारी, भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. यानंतर आता महाविकास आघाडीमधील कॉँग्रेस पक्षाची एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत सांगण्यात आलंय. कॉँग्रेसकडून उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबररोजी उमेदवारी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच काही नावांची जोरदार चर्चा आहे. (Congress)
कॉँग्रेसच्या 54 उमेदवारांची नावे निश्चित?
नाना पटोले – साकोली
विरेंद्र जगताप- धामणगाव
यशोमती ठाकूर- तिवसा
विजय वडेट्टीवार- ब्रह्मपुरी
अमित झनक- रिसोड
नितीन राऊत- उत्तर नागपूर
विकास ठाकरे- पश्चिम नागपूर
रणजित कांबळे- देवळी (वर्धा)
सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)
डॉ सुनील देशमुख – अमरावती शहर (Congress)
बबलू देशमुख- अचलपूर
भाजपची पहिली यादी जाहीर
या नावावर कॉँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. उद्या कॉँग्रेस यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यात नेमकी कुणाला संधी मिळाली ते स्पष्ट होईलच. दरम्यान, महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. महायुतीत भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजितदादा गट 45 जागांवर लढण्याची शक्यता आहे. (Congress)
News Title : Congress 54 candidates confirmed
महत्वाच्या बातम्या –
आज सोमवारी, भोलेनाथ कोणत्या राशीवर प्रसन्न होणार?, वाचा राशी भविष्य
कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची लेक, भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे
पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट; पाहा कोणाचं तिकीट कापलं
‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार
सर्वात मोठी बातमी! भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?






