‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

On: October 20, 2024 4:10 PM
Maharashtra
---Advertisement---

Bjp Candidate List | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून (Bjp Candidate List) पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण () यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

अशोक चव्हाणांची मुलगी भोकरमधून लढणार

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

धुळे शहरमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदखेडामधून जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

मोठी बातमी! नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन होणार?

लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाचा सर्वात मोठा खुलासा!

छत्रपती संभाजीनगमध्ये मोठी घडामोड; मनोज जरांगेंची ताकद वाढली

महाविकास आघाडीचा महायुतीवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now