नियमबाह्य भोंग्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय!

On: March 11, 2025 2:30 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis |  राज्यात भोंग्यांबाबतच्या नियमांचे कठोर पालन होणार असून, परवानगीशिवाय वाजवले जाणारे भोंगे जप्त केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. त्यांनी विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान भोंग्यांवर नियंत्रण आणि नियमबाह्य आवाजाबाबत कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले.

नवीन नियम काय असतील?

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे पूर्णतः बंद राहतील.

दिवसा आवाजाची मर्यादा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल असावी.

भोंग्यांसाठी सरसकट परवानगी नसेल, ठराविक कालावधीसाठीच परवानगी मिळेल.

परवानगी संपल्यानंतर पुन्हा अर्ज करावा लागेल.

ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल, तिथे पुन्हा परवानगी दिली जाणार नाही.

पीआयवर थेट कारवाईचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले की, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नियमभंग होईल, त्या परिसरातील पोलीस निरीक्षक (PI) जबाबदार राहील. भोंग्यांबाबत नियमांचे पालन न केल्यास संबंधित पीआयवर कारवाई केली जाईल. प्रत्येक प्रार्थनास्थळी परवानगी घेतली आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची असेल.

‘भोंग्यांचा विषय धार्मिक नाही, ध्वनी प्रदूषण महत्त्वाचे’

आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande) यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भोंग्यांवर कठोर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “भोंग्यांचा विषय धार्मिक नाही, तर ध्वनी प्रदूषणाचा आहे.” त्यामुळे कोणत्याही धार्मिक स्थळी असलेल्या भोंग्यांनी कायदेशीर मर्यादा ओलांडल्यास त्यावर कठोर कारवाई होईल.

Title : CM Devendra Fadnavis Strict Action Against Illegal Loudspeakers

 

Join WhatsApp Group

Join Now