पूरग्रस्तांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांनी शेताच्या बांधावरुन केली ‘ही’ मोठी घोषणा

On: September 24, 2025 1:07 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून मोठी घोषणा केली. “नुकसान भरपाईसाठी नियमांच्या चौकटीत न अडकता तातडीने नागरिक व शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे,” असे ते म्हणाले.

मदतीसाठी निधी रिलीज :

फडणवीस यांनी सांगितले की, “काल आम्ही जवळपास २ हजार कोटी रुपये रिलीज केले आहेत. शेतकऱ्यांना तर मदत करणारच आहोत, पण ज्यांचे घर, अन्नधान्य किंवा संसाराचे सामान नष्ट झाले आहे, त्यांनाही मदत दिली जाईल.” केंद्र सरकारकडूनही मदत मिळणार असून दिवाळीपूर्वी सर्वांना आर्थिक सहाय्य पोहोचवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “ओला दुष्काळ ही बोलीभाषेतली संज्ञा आहे. मात्र पावसामुळे झालेले नुकसान हे दुष्काळी परिस्थितीसमान धरून त्याप्रमाणे सर्व सवलती व नुकसानभरपाई दिली जाणार आहे.” (Devendra Fadnavis flood relief)

Devendra Fadnavis | तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात :

“पहिल्यांदा तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे. एनडीआरएफकडे आधीपासून असलेले एडव्हान्स निधी खर्च करण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis flood relief)

काही ठिकाणी पाणी अचानक सोडल्यामुळे नुकसान झाल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “काही भागात पाऊस ढगफुटीसारखा कोसळल्याने नेहमीसारखं रेग्युलेट करून पाणी सोडणं शक्य नव्हतं. या संदर्भात कोणी चूक केली का हे तपासलं जाईल. पण प्रत्यक्षात अनरेग्युलेटेड कॅचमेंटमध्ये ढगफुटी झाली होती.”

News Title: CM Devendra Fadnavis Announces ₹2,000 Cr Flood Relief Package for Farmers and Citizens

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now