स्वस्तात घर खरेदी करायची संधी! २६ हजार घरांसाठी लवकरच होणार सोडत

On: February 16, 2025 2:32 PM
CIDCO House Lottery
---Advertisement---

CIDCO Lottery | नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात सिडको (CIDCO Lottery) ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत २६ हजार घरांची सोडत काढणार आहे. ही सोडत १५ फेब्रुवारीला तळोजा नोडमध्ये काढली जाणार आहे.

विशेष म्हणजे, विक्रीविना पडून असलेल्या घरांकडे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी, ही सोडत प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकल्पस्थळी सोडत काढण्याचा निर्णय

सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा (Taloja), कळंबोली, बामणडोंगरी, खारकोप आणि मानसरोवर या भागांत २६,००० घरांच्या विक्रीची योजना जाहीर केली होती. तब्बल दीड लाख अर्ज आले, त्यापैकी २१,३९९ अर्जदारांनी बुकिंगची रक्कम भरली आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी तयार झाली असून, १५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता तळोजातील पाचनंद सेक्टर २८ मधील स्थळावर संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

सिडकोची तळोजा नोडमध्ये जवळपास ५ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. विविध कारणांमुळे या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, सिडकोची आर्थिक कोंडी होत आहे. (CIDCO Lottery)

ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

ग्राहकांना सिडकोच्या गृहप्रकल्पाची आणि तेथील सोयीसुविधांची माहिती मिळावी, यासाठी ही सोडत तळोजा नोडमधील गृहप्रकल्पाच्या आवारात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून अधिकाधिक नागरिक या योजनेत सहभागी होतील आणि सिडकोच्या (CIDCO) घरांची विक्री होईल. यातून सिडकोची (CIDCO)आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Title : CIDCO Lottery for 26,000 Houses in Taloja

 

Join WhatsApp Group

Join Now