सिडकोची मोठी अपडेट! नवी मुंबईत 22,000 स्वस्त घरांची लॉटरी जाहीर

On: September 17, 2025 5:46 PM
CIDCO Lottery 2025
---Advertisement---

CIDCO Lottery 2025 | नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. सिडको (CIDCO) कडून तब्बल २२,००० घरांची भव्य लॉटरी जाहीर होणार असून त्याबाबतची नवी अपडेट समोर आली आहे. (CIDCO Lottery 2025)

दसरा-दिवाळीत सोडत जाहीर होण्याची शक्यता :

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात घर मिळवण्याची सुवर्णसंधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. (CIDCO Lottery 2025)

घरांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून सिडको परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत आहे. सिंघल यांनी स्पष्ट केले की, घरांच्या किमती आणखी कमी करण्याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्याचा निर्णय होईल. त्यामुळे घरे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

CIDCO Lottery 2025 | विक्रीविना पडून असलेली घरेही लॉटरीत :

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत सिडकोच्या अनेक लॉटरींत काही घरे विकली गेली नाहीत. ती घरे विक्रीविना पडून आहेत. आता या घरांसह नव्याने बांधकाम पूर्ण झालेली घरेही या २२ हजार घरांच्या लॉटरीत समाविष्ट असतील.

कुठे मिळणार घरे? :

वाशी

जुईनगर

खारघर

तळोजा (पनवेल)

द्रोणागिरी

या भागांमध्ये घरे असण्याची शक्यता आहे. लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत घरांचे अचूक ठिकाण आणि किंमती जाहीर होतील.

News Title: CIDCO Lottery 2025: 22,000 affordable homes in Navi Mumbai, draw likely on Dussehra or Diwali

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now