‘मोठ्ठ्या ताई, बुरखा टराटरा फाटलाय….’; चित्रा वाघ सुप्रिया सुळेंवर संतापल्या

On: November 1, 2023 6:45 PM
---Advertisement---

मुंबई | खासदार सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केलेली.

आमदार अपात्रेवर बोलतानाही फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी दगाबाजी केली, आता अजित दादा गटाने सांभाळून राहिलं पाहिजे, असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलेला. त्यांच्या या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

राज्यातील मोठ्या ताई, तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी तुम्ही आहात की काय अशी शंका तुमच्या चिथावणीखोर वक्तव्यांवरून येतेय, ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) टीका केली आहे.

आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर काढू नका हा …किंवा काढायचा प्रयत्न ही करू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुमचा चिडचिडेपणा का वाढला याचं कारण राज्यातील जनतेला पुरते ठावूक आहे, असं त्या म्हणाल्यात.

कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी तुमची स्थिती झालीय.. जळी-स्थळी तुम्हाला देवेंद्रजी दिसताहेत. हा आजार बरा नव्हे ताई, लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘माझ्यासारखे लबाड लोक…’; मराठा आरक्षणावर भिडेंचं मोठं वक्तव्य

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now