Chiranjeevi | दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) हे आपल्या अभिनयासोबतच वक्तव्यांमुळेही चर्चेत राहतात. सध्या ते एका वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. एका कार्यक्रमात “कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी राम चरणला मुलगा हवा” असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
चिरंजीवींचे वक्तव्य आणि ट्रोलिंग
‘ब्रह्म आनंदम’ (Brahma Anandam) या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये चिरंजीवी यांनी राम चरणला (Ram Charan) मुलगा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “माझ्या घरात महिलांचाच सुकाळ आहे. मला कधी कधी एका लेडीज हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं वाटतं. त्यामुळे राम चरणला यावेळी तरी मुलगा व्हावा, जेणेकरून कुटुंबाचा वारसा पुढे जाईल.”
चिरंजीवी यांच्या या वक्तव्यावर मोठी टीका होत आहे. अनेकांनी त्यांना “मुलगा-मुलगी समान” असल्याचे लक्षात आणून दिले. सोशल मीडियावर अनेकांनी “वारसा फक्त मुलगाच पुढे नेतो का?” असा सवाल विचारत त्यांना ट्रोल केले.
चिरंजीवींच्या कुटुंबात नेमकं काय घडलं?
राम चरण आणि उपासना (Upasana Kamineni) यांना लग्नाच्या 12 वर्षांनी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव क्लिन कारा (Klin Kaara) ठेवले आहे. चिरंजीवी यांना याआधीही दोन मुली आहेत – श्रीजा (Sreeja) आणि सुष्मिता (Sushmita), ज्यांना प्रत्येकी दोन मुली आहेत. त्यामुळेच चिरंजीवी यांनी आपल्या वक्तव्यात राम चरणला मुलगा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
मात्र, त्यांचे हे वक्तव्य अनेकांना खटकले असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष समानतेबाबत चर्चा रंगल्या आहेत. चिरंजीवींनी या टीकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Title : Chiranjeevi Controversial Comment on Grandson Sparks Backlash






