Chhava Cineme : विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे. 2025 मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरील चित्रपट म्हणून ‘छावा’चा समावेश झाला आहे. तसेच पहिल्या दिवशी विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम या चित्रपटाने मोडला आहे.
‘छावा’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या ऐतिहासिक भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 33.10 कोटींची कमाई केली आहे. ही विकीच्या करिअरमधील पहिली डबल डिजिट ओपनिंग असलेली फिल्म ठरली आहे.
यापूर्वी विकीच्या सर्वाधिक ओपनिंग असलेल्या चित्रपटांमध्ये बैड न्यूज (2024) – 8.62 कोटी, उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019) – 8.20 कोटी, राजी (2018) – 7.53 कोटी, सॅम बहादूर (2023) – 6.25 कोटी इतकी कमाई केलेली होती. मात्र, ‘छावा’ने या सर्व विक्रमांना मागे टाकत पहिल्याच दिवशी 50 कोटींच्या पार वर्ल्डवाइड कलेक्शनचा टप्पा गाठला आहे.
वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची डरकाळी
विदेशातही ‘छावा’ने जबरदस्त कमाई करत 17 कोटी रुपये कमावले आहेत. या जोरावर चित्रपटाने (Chhava Cinema) पहिल्याच दिवशी एकूण 50 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे.
पहिल्या वीकेंडमध्ये किती कमाई करेल ‘छावा’?
दरम्यान, वैलेंटाइन डेच्या रिलीजमुळे Chhava Cinema ला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पहिल्या वीकेंडमध्ये ‘छावा’ 130 कोटींच्या आसपास कमाई करू शकतो, अशी शक्यता बॉक्स ऑफिस तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘छावा’ विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरण्याच्या दिशेने वाटचाल करतना दिसत आहे.
English Title: Chhava Cinema Crosses ₹50 Crore on Opening Day
छावा सिनेमामुळे चमकले विकी कौशलचे स्टार, पहिल्याच दिवशी करुन दाखवली ‘ही’ कमाल!
बॉक्स ऑफीसवर छावा चित्रपटाची कमाल; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी






