छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार; ‘हे’ मोठं खातं मिळणार?

On: May 20, 2025 9:40 AM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा बदल घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते त्यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजभवनात 10 वाजता शपथविधी; 50 पाहुण्यांची उपस्थिती :

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे खाते रिक्त होते. आता हे खाते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे दिले जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. याआधी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळाली नव्हती, त्यामुळे ते नाराज होते. आजच्या शपथविधीमुळे त्यांच्या नाराजीला पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत.

शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी 10 वाजता पार पडणार असून सुमारे 50 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पाहुण्यांना सकाळी 9 वाजेपर्यंत राजभवनात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छगन भुजबळ यांच्या पुनःप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटात नवचैतन्य येण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal | धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि खाती रिक्त :

बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा अप्रत्यक्ष संबंध आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अन्न व नागरी पुरवठा खाते रिक्त झाले. हे खाते आता छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

News Title: Chhagan Bhujbal to Take Oath as Minister Today; Likely to Get Food & Civil Supplies Portfolio

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now