चेतन चौधरीला मोठा फटका; मार्केटयार्डमधील दुकान मालकाने केली हकालपट्टी!

On: June 28, 2026 2:28 PM
Chetan Choudhari
---Advertisement---

Chetan Choudhari | पुण्यातील (Pune) तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील (Ketan Agrawal Case) मुख्य संशयित आरोपी चेतन चौधरी याच्या अडचणीत आता कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे पोलीस कोठडीत चेतनची कसून चौकशी सुरू असताना, दुसरीकडे त्याला व्यावसायिक पातळीवरही मोठा धक्का बसला आहे.

थेट खुनाच्या गुन्ह्यात नाव आल्यामुळे पुण्याच्या मार्केटयार्डमधील दुकानमालकाने कडक भूमिका घेत चेतनची दुकानातून हकालपट्टी केली आहे.

मार्केटयार्डमधील ‘धनश्री सेल्स’ गेले हातातून

सुक्या मेव्याचा होता व्यापार: मुख्य आरोपी चेतन चौधरी याचे पुण्याच्या गुलटेकडी येथील प्रसिद्ध मार्केटयार्ड परिसरात ‘धनश्री सेल्स जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट’ नावाचे दुकान होते. या दुकानातून तो ड्रायफ्रूट्स (सुकामेवा), विविध प्रकारचे मसाले आणि कडधान्यांचा घाऊक (Wholesale) व्यापार करायचा.

इथेच व्हायच्या सियाशी भेटी: गेल्या ३ ते ४ वर्षांपासून चेतनने हे दुकान भाड्याने घेतले होते. याच मार्केटयार्ड परिसरात व्यवसायाच्या निमित्ताने त्याची आणि मुख्य आरोपी सिया गोयल यांची अनेकदा भेट व्हायची आणि त्यांच्यात सूत जुळले होते.

नेमका १५ जूनला संपला भाडेकरार अन् घात झाला

योगायोग म्हणजे, चेतनच्या या दुकानाचा अधिकृत भाडेकरार (Rent Agreement) नेमका १५ जून रोजी संपला होता. चेतनचा आजवरचा व्यापार पाहता दुकानमालक हा भाडेकरार पुढे नूतनीकरण (Renew) करून देणार होते. मात्र, १८ जून रोजी लोहगडावर केतन अग्रवाल हत्याकांड घडले आणि त्यात चेतन मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. चेतननेच केतनला पाठीमागून येत ४०० फूट खोल दरीत ढकलल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

“अशा गुन्हेगाराला जागा देणार नाही”; दुकानमालकाची आक्रमक भूमिका
चेतनच्या या अंगावर काटा आणणाऱ्या क्रूर कृत्याची माहिती मिळताच दुकानमालकांनी अत्यंत कडक पाऊल उचलले. त्यांनी भाडेकरार पुढे वाढवण्यास स्पष्ट नकार दिला.

दुकानमालकाची भूमिका:
“जो माणूस थेट खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे आणि अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही आमचे दुकान भाड्याने देणार नाही.”

अशी आक्रमक भूमिका घेत दुकानमालकांनी चेतनच्या कुटुंबीयांना संपर्क साधून दुकानातील सर्व माल आणि साहित्य तात्काळ रिकामे करायला लावले.

एककीडे पोलीस तपासात डमी पुतळ्याच्या साहाय्याने आणि ३ वर्षांच्या ‘मॅरेज मास्टरप्लॅन’च्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस चेतन आणि सियाभोवती पाश आवळत आहेत; तर दुसरीकडे समाजाने आणि व्यापारी वर्गानेही त्याच्यावर अशा प्रकारे आर्थिक व सामाजिक बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.

News Title: Chetan Choudhari Dry Fruits Shop Evicted Market Yard ketan Agarwal death

Join WhatsApp Group

Join Now