अवघ्या १ रुपयात १ लिटर; ‘या’ ठिकाणी स्वस्त इंधनासाठी ग्राहकांच्या रांगा

On: January 6, 2026 4:47 PM
Cheapest Petrol in the World
---Advertisement---

Cheapest Petrol in the World | सध्या भारतात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या आसपास फिरत असताना जगात असा एक देश आहे, जिथे पेट्रोल चॉकलेटपेक्षाही स्वस्त मिळते. भारतात जिथे वाहनचालकांना टाकी फुल्ल करताना हजारो रुपये खर्च करावे लागतात, तिथे या देशात अवघ्या 50 रुपयांत बाईकची संपूर्ण टाकी भरते. त्यामुळे जगभरातील नागरिकांना या देशातील इंधन दर ऐकून धक्का बसतो आहे. (Cheapest Petrol in the World)

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश सध्या राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे चर्चेत असला तरी पेट्रोलच्या दरांमुळे तो नेहमीच जागतिक चर्चेचा विषय ठरतो. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर हा देश पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र व्हेनेझुएलाची खरी ओळख ही जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश अशीच आहे.

अवघ्या 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल :

व्हेनेझुएलात एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ 0.01 ते 0.035 डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात पाहिल्यास ही किंमत साधारणपणे 1 ते 3 रुपये प्रति लिटर इतकी होते. त्यामुळे तिथे एका चॉकलेटच्या किंमतीत पेट्रोल मिळते, असे म्हटले जाते. भारतात जिथे बाईक किंवा कारची टाकी फुल्ल करायला हजार रुपयेही कमी पडतात, तिथे व्हेनेझुएलात 35 ते 50 लिटर क्षमतेची टाकी केवळ 50 ते 150 रुपयांत भरली जाते.

या देशाकडे प्रचंड प्रमाणात खनिज तेलाचा साठा असल्यामुळे सरकारकडून पेट्रोलवर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. याच कारणामुळे व्हेनेझुएला हा जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश म्हणून ओळखला जातो. इंधन स्वस्त असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Cheapest Petrol in the World | व्हेनेझुएलाची दुहेरी इंधन प्रणाली :

व्हेनेझुएलात पेट्रोल विक्रीसाठी दुहेरी इंधन प्रणाली लागू आहे. यामध्ये एक प्रकार सबसिडीचे पेट्रोल असून ते स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे प्रीमियम पेट्रोल, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरांनुसार ठरवली जाते आणि त्यावर कोणतीही सरकारी सबसिडी दिली जात नाही.

वृत्तानुसार, व्हेनेझुएलात प्रीमियम पेट्रोलची किंमत साधारणपणे 42 रुपये प्रति लिटर इतकी आहे, जी भारतातील पेट्रोल दरांपेक्षा अजूनही कमी आहे. जर कोणी प्रीमियम पेट्रोलचा वापर केला, तर 50 लिटरची टाकी भरण्यासाठी जवळपास 20 ते 25 डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1700 ते 2100 रुपये खर्च येतो. (Cheapest Petrol in the World)

व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक तेलसाठा असलेला देश मानला जातो. 2023 पर्यंत या देशाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल तेलाचा साठा होता. त्यानंतर सौदी अरेबिया, इराण आणि कॅनडा या देशांचा क्रमांक लागतो. याच प्रचंड तेलसाठ्यामुळे व्हेनेझुएलात पेट्रोल इतक्या स्वस्त दरात उपलब्ध आहे आणि म्हणूनच हा देश ‘जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश’ म्हणून ओळखला जातो.

News Title: Cheapest Petrol in the World: Get 1 Litre Petrol for ₹1 in Venezuela

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now