अजित पवारांनी खडसावलं, चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही!

On: May 9, 2024 2:40 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

Chandrakant Patil | बारामतीतील चुरशीच्या निवडणुकीत काय होणार याविषयीची चिंता महायुतीच्या नेत्यांना लागून आहे. बारामतीत पराभव देखील ओढवू शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांसह बड्या नेत्यांना वाटत आहे. अशात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार यांनी मौन सोडलं. यामुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.

बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) हे निवडणुकीला उभे नव्हते, मग त्यांचा पराभव करण्याची चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भाषा योग्य नव्हती. मी त्यांना तसं स्पष्ट सांगितलं आणि तुम्ही फक्त पुण्यातच प्रचार करण्याची सूचना दिल्याचं अजित पवारांनी म्हटलं.

जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांचं ते वक्तव्य चूक होतं, हे मी मान्य करतो, अशी जाहीर कबुलीच अजित पवार यांनी दिली. मात्र अजित पवारांनी इतक्या उघडपणे चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पवारांनी चंद्रकांत पाटलांना चांगलंच खडसावलं.

चंद्रकांत पाटलांनी तोंडातून शब्द काढला नाही

अजित पवारांनी खडसावल्यानंतर चंद्रकांत पाटलांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील हे वादविवादाचा विषय येतो तेव्हा बिलकूल नमतं न घेता आपली भूमिका ठामपणे मांडत असतात. मात्र यावेळी चंद्रकांत पाटील गप्प झाल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही.

काय म्हणाले होते Chandrakant Patil?

प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात बारामतीत जावून आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे. राजकीय तराजूनं मोजमाप केल्यास शरद पवारांचा तराजू जास्त वजनदार वाटतो. त्यामुळेच त्यांचा पराभव भाजपसाठी महत्वाचा असल्याचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांपासूनही अंतर राखून आहेत. त्यामुळे भाजपने इतक्या महत्त्वाच्या नेत्याला प्रचारापासून दूर का ठेवले, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पुणे हादरलं! पानटपरीवर घडला धक्कादायक प्रकार

संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता

कर्जवाटपासंदर्भात आरबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नवीन नियम

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now