Chanakya Niti | नवरा-बायको म्हणजे दोन शरीर एक जीव, असं म्हटलं जातं. परंतु, आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीने एकमेकांसोबत चुकूनही करू नयेत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी केल्यास वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. जर पती-पत्नीने आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी एकमेकांना सांगितल्या तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दोघांनीही या गोष्टी आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवल्यास ते उत्तम राहील. (Chanakya Niti)
‘या’ चुका पडतील महाग
नवरा-बायकोमध्ये वाद होणे स्वाभाविक आहे. परंतु, दोघांपैकी एकाचा जरी रागीट स्वभाव असला तरी तो घातक ठरू शकतो. रागीट व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण करू शकत नाही. पती-पत्नीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी वर्तमानातील खर्चासोबतच भविष्यासाठीही बचत केली पाहिजे. दोघांनीही विचारपूर्वक पैसे खर्च करावेत, पाण्यासारखा पैसा उधळू नये.
पती-पत्नीने आपल्या नात्याची मर्यादा कधीही ओलांडू नये, अन्यथा त्यांचे नाते टिकत नाही. नाते तुटले नाही तरी त्याला तडा जाऊ शकतो. त्यामुळे दोघांनीही आपले संस्कार आणि मर्यादा विसरू नयेत. खोटेपणा कोणत्याही नात्याचा नाश करतो. वैवाहिक आयुष्य सत्य आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. यात थोडी जरी गडबड झाली तरी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. (Chanakya Niti)
आयुष्यात अनेक संकटे येतात. पती-पत्नीने एकमेकांना मदत करून त्यांचा सामना करायचा असतो. अशावेळी संयम राखणे अत्यंत महत्वाचे ठरते. धैर्यच दोघांना चांगल्या-वाईट काळात एकत्र ठेवते.
Title : chanakya niti tips for happy married life






