Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले गेले आहेत. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.चाणक्य यांचे खरे नाव विष्णुगुप्त होते. त्यांना कौटिल्य असेही म्हणतात.
आचार्य चाणक्य मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते, ज्यांनी चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्थशास्त्र, चाणक्य नीति, नीतिशास्त्र आणि मुद्राराक्षस या त्यांच्या प्रसिद्ध रचना आहेत.
चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.
चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रामध्ये सांगितलंय की, जीवनात काही सवयी अशा असतात;ज्यामुळे हातात कधीच पैसा टिकत नाही. अशा व्यक्तींच्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. त्यामुळे या सवयी असल्या तर लगेच त्याचा त्याग करायला हवा. आता या सवयी कोणत्या, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.
‘या’ सवयींचा आत्ताच त्याग करा
अस्वच्छ घर आणि राहणीमान : चाणक्य (Chanakya Niti) म्हणतात की व्यक्तीने गरीब असलं तरी नेहमी साफ आणि स्वच्छ राहायला हवं. आपले राहणीमान निर्मळ असायला हवे. आपल्या घरात नेहमी साफ-सफाई ठेवायला हवी. जिथे घाण असते, तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. स्वच्छ घरात लक्ष्मी प्रसन्न होते. मात्र, जिथे काहीच स्वच्छता नसेल, तिथे कुणालाच राहण्याची इच्छा होत नाही.
बेटाईम जेवण : व्यक्तीने कधीच बेटाईम जेवू नये.यामुळे आरोग्य तर खराब होतेच शिवाय घरात नेहमी दरिद्री असते. व्यक्तीने कधीच बेडरूममध्ये किंवा बेडवर जेवू नये. जमिनीवर बसून नीट जेवणाचा आनंद घ्यावा. नीट जेवलं नाही तर आरोग्य खराब होते, मग व्यक्ती कष्ट करण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे नीट आणि वेळेवर जेवून तंदुरुस्त राहून कष्ट करावे. यश नक्कीच मिळेल.
अयोग्य मार्गाने धन कमावू नये : धन कधीच अयोग्य आणि चुकीच्या मार्गाने कमावू नये. असे धन कधीच टिकत नाही. असे धन आयुष्यात चांगल्या कामासाठी वापरू नये. यामुळे अजून दरिद्री येईल. त्यामुळे योग्य आणि इमानदारीच्या (Chanakya Niti) मार्गानेच पैसे कमवावे.
News Title- Chanakya Niti for Financial Prosperity in home
महत्वाच्या बातम्या-
नवऱ्यासाठी धावून आली अथिया शेट्टी; के.एल. राहुलशी वाद घालणाऱ्या संजय गोयंकांना चांगलंच झापलं?
उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा






